पतीचे विवाहबाह्य संबंध ही पत्नीशी क्रूरता नव्हे - सुप्रीम कोर्ट
पतीचे विवाहबाह्य संबंध असणे ही पत्नीशी क्रूरता नसल्याचा निर्णय गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिला. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हा निकाल दिलाय.
नवी दिल्ली : पतीचे विवाहबाह्य संबंध असणे ही पत्नीशी क्रूरता नसल्याचा निर्णय गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिला. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हा निकाल दिलाय.
पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या कारणाने एका महिलेने लग्नाच्या सात वर्षानंतर आत्महत्या केली. याप्रकरणी कोर्टात याचिका दाखल कऱण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे म्हटलेय.
विवाहबाह्य संबंधांना अवैध मानले जाऊ शकते. मात्र ती पत्नीशी क्रूरता नव्हे. विवाहबाह्य संबंधामुळे दीपाने आत्महत्या केली. याचा अर्थ नवऱ्याच्या क्रूरतेमुळे तिने आत्महत्या केल्याचे सिद्ध होत नाही. तसेच कलम 498-ए नुसार ते सिद्ध कऱणे कठीण आहे, असे न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती अमित्व रॉय यांच्या खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, क्रूरता केवळ शारिरीकच असू शकत नाही तर मानसिकही असू शकते. मात्र हे त्या प्रकरणातील तथ्यावर अवलंबून असते, असेही कोर्टाने सांगितले.