तामिळनाडूच्या विधानसभेत तुफान राडा
तामिळनाडूमध्ये ई. पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
चेन्नई : तामिळनाडूमध्ये ई. पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. या विश्वासदर्शक ठरावावेळी तामिळनाडूच्या विधानसभेमध्ये अभूतपूर्व राडा पाहायला मिळाला. गुप्त मतदानावरून डीएमकेच्या आमदारांनी सभागृहातील खुर्च्यांची तोडफोड केली. एवढच नाही तर या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांचे कपडेही फाडण्यात आले.
यानंतर डीएमकेच्या 88 आणि IUML च्या एका आमदाराला सभागृहाबाहेर काढण्यात आलं. काँग्रेसनं या विश्वासदर्शक ठरावावेळी सभात्याग करायचा निर्णय घेतला.
दरम्यान पलानीस्वामींच्या बाजूनं 122 आमदारांनी मतदान केलं तर 11 आमदारांनी विरोधात मतदान केलं. जयललितांच्या निधनानंतर पनीरसेल्वम हे तामीळनाडूचे मुख्यमंत्री झाले. यानंतर लगेचच शशिकलांनी पनीरसेल्वम यांची हकालपट्टी करून स्वत:ची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करून घेतली, पण यानंतर लगेचच बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला दोषी आढळल्यानं त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली, त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न भंगलं.
तुरुंगात जाण्याआधी शशिकलांनी पलानीस्वामींची विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड केली. यानंतर पलानीस्वामींना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती.