केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांची १५० जणांविरुद्ध गैरवर्तनाची तक्रार
केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी आपल्यासोबत १५० जणांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी आपल्यासोबत १५० जणांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.
‘अपना दल’च्या नेत्या आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री , उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये रविवारी दुपारी एका रोड शोला गेल्या होत्या. त्या दरम्यान हा प्रकार करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच राणीगंज पोलिस स्टेशनमध्ये १५० जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी समाजवादी पक्षाचे स्थानिक नेते विनोद दुबे आणि त्यांच्या १५० कार्यकर्त्यांवर गैरवर्तन केल्याचा आरोप अनुप्रिया यांनी केला आहे.