नवी दिल्ली : भारतात अमेरिकेतील दोन शॉपिंग वेबसाईटविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

yeswevibe.com आणि  lostcoast.com या दोन शॉपिंग वेबसाईटविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलीय. भारत स्काऊटस् अॅन्ड गाईडस् आयुक्त नरेश कड्यान यांनी वेबसाईटवर दिसत असलेल्या वस्तू हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत असल्याचं म्हटलं. 


या शॉपिंग वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या बिअरच्या बाटलीवर हिंदू देवता 'गणपती'चा फोटो आहे तर बुटांवर 'ओम' असं लिहिण्यात आलंय. 


कड्यान यांनी हे प्रोडक्ट या वेबसाईटवरून हटवण्यात यावेत, अशी मागणी केलीय. त्यांनी दिल्लीच्या प्रशांत विहार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासोबतच परदेश मंत्रालयालाही याबाबत पत्र लिहिलंय. 


याआधीही अमेझॉन या शॉपिंग वेबसाईटवर भारतीय झेंड्याचं चित्र असलेलं डोअरमॅट विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. सोशल मीडियावरही याविरुद्ध तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. परदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी कानउघडणी केल्यानंतर अमेझॉननं हे प्रोडक्ट आपल्या वेबसाईटवरून हटवले होते.