नोकरीवरुन काढून टाकले म्हणून महिलेने स्वत:ला घेतले जाळून
नोकरीवरुन काढून टाकले म्हणून एका महिलेने स्वत:ला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना दिल्लीच्या पूर्व भागात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीच्या मौजपूर भागात ही महिला एका शाळेत काम करत होती. शुक्रवारी ही घटना घडली.
नवी दिल्ली : नोकरीवरुन काढून टाकले म्हणून एका महिलेने स्वत:ला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना दिल्लीच्या पूर्व भागात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीच्या मौजपूर भागात ही महिला एका शाळेत काम करत होती. शुक्रवारी ही घटना घडली.
घटनेनंतर महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. या अपघातात महिला ५० टक्के भाजल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. महिलेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या मुलीला नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ती तणावाखाली होती.
प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि बॉस यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र ही मैत्री बॉसच्या पत्नीला पसंत नव्हती.
याकारणामुळे पीडित महिलेला नोकरीवरुन काढण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. दरम्य़ान, या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.