सीतापूर : विवाह सोहळ्यात झालेल्या गोळीबारात नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये प्रेम नगरमध्ये विवाह सोहळ्यादरम्यान वरातीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यासाठी काहींनी गोळीबार केला. या गोळीबारात नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरदेव अमित याची घोड्यावर बसून वरात काढण्यात आली,. यावेळी अनेकजण वरातीत नृत्य करत होते. वरात मंडपाजवळ आली होती, आनंदाच्या भरात काहींनी गोळीबार केला. यातील एक गोळी नवरदेवाच्या डोक्‍यात घुसली. यात नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


दरम्यान, अमितला चुकून गोळी लागली किंवा, कुणी जाणीवपूर्वक गोळी मारली याचा पोलीस शोध घेत आहेत, मात्र नेमकी गोळी कुणी मारली हे अजून समजू शकलेलं नाही.