शिमला : सगळीकडे नाताळची धूम सुरू असताना निसर्गाकडूनही शिमला आणि उत्तराखंडला बर्फवृष्टीच्या रुपात नाताळची अनोखी भेट मिळाली आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये या मोसमातल्या पहिल्या बर्फवृष्टीचा नजारा पाहायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिमल्यामधल्या कुफरी या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळी बर्फवृष्टीचं लोभस दृश्य पाहायला मिळालं. तर डलहौसीतही पर्यटकांनी बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद लुटला. दुसरीकडे उत्तराखंडमध्येही हेच चित्र पाहायला मिळालं. उत्तराखंडमधल्या टेहरी इथेही बर्फवृष्टी झाली.


उत्तराखंडमधली या मोसमातली ही पहिलीच बर्फवृष्टी आहे. तिथल्या पर्यटकांनी याचा मनमुराद आनंद लुटला. यामुळे या परिसरात बर्फाची पांढरीशुभ्र चादर पांघरली गेल्याचं दिसून आलं. बर्फवृष्टीमुळे पाराही कमालीचा घसरला.