जयपूर : टाटा ग्रुपनं आपला पसारा आता ई-कॉमर्स क्षेत्रात पसरवण्यास सुरुवात केलीय. टाटा ग्रुप लवकरच आपलं नवीन व्हेंचर शॉपिंग वेबसाईट 'क्लिक्यू'च्या माध्यमातून घराघरात दाखल होण्याचा टाटाचा मानस आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा ग्रुप हा भारतातला सर्वात मोठ्या ग्रुपपैंकी एक मानला जातो. आपल्या 'क्लिक्यू' (CLiQ)या वेबसाईटवर टाटा गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहेत. 


२७ मेपासून ही वेबसाईट सामान्यांसाठी सुरू होणार आहे. आपल्या पसंतीच्या गोष्टी ग्राहकांना इथं ऑनलाईन पद्धतीनं खरेदी करता येतील. ग्राहकांना ध्यानात घेता कंपनीनं जवळपास ८० ब्रॅन्ड्सना यासाठी हाताशी घेतलंय. ही वेबसाईट मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातूनही काम करताना दिसेल. 


मात्र यामुळे, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अमेझॉन, फॅशन ई मिंत्रा, जेबाँग  यांसारख्या शॉपिंग वेबसाईटचे धाबे मात्र दणाणलेत. 'क्लिक्यू'ला टक्कर देणं त्यांच्यासाठी खूप सोप्पी गोष्ट ठरणार नाही, हे नक्की