मुंबई : डिसेंबर 2015 मध्ये आयआयटी प्लेसमेंटमधून लाखो रुपयांची सॅलरी पॅकेज मिळालेल्या 9 विद्यार्थ्यांना सध्या फ्लिपकार्टनं मोठं टेन्शन दिलं आहे. या विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचं आश्वासन कंपनीनं दिलं, पण अजून कंपनीत रूजू करून घेतलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी ठरल्यानुसार जून 2016 मध्ये हे विद्यार्थी फ्लिपकार्टमध्ये जॉईन होणार होते, पण फ्लिपकार्टने आता ही जॉईनिंग डेट डिसेंबर 2016 पर्यंत पुढं ढकलली आहे. हा विद्यार्थ्यांचा विश्वासघात असल्याचा आरोप आयआयटीनं केला आहे. नुकसानभरपाईपोटी दीड लाख रूपयांचा बोनस फ्लिपकार्ट देणार आहे, 


इतर कंपन्यांच्या लाखो रुपयांच्या ऑफर्स सोडून विद्यार्थ्यांनी फ्लिपकार्टची निवड केली. यापैकी अनेकांना एज्यूकेशन लोन भरायचं आहे, त्यामुळे त्यांचा संताप वाढला आहे. 


फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनीत व्यवस्थापकीय बदल होत असल्यामुळे विद्यार्थ्यांची जॉईनींग जून २०१६ ऐवजी डिसेंबर २०१६ मध्ये करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असून याबदल्या विद्यार्थ्यांना 1.5 लाख रुपये बोनस दिला जाणार आहे. पण सहा महिन्यांच्या तुलनेत ही किंमत कमी असल्यानं नाराजी व्यक्त होतं आहे.


या दिरंगाईची मोठी किंमत फ्लिपकार्टला मोजावी लागू शकते. कारण यापुढे आयआयटी प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी फ्लिपकार्टला न बोलावण्याचा निर्णय आयआयटी घेणार असल्याचं समजतं आहे.