बिहारमधली पूरस्थिती गंभीर, आतापर्यंत 90 जणांचा बळी
बिहारामध्ये कोसी आणि गंगेला आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 90 जणांचा बळी गेला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात आलेल्या महाभयंकर पुराचा फटका जवळपास 50 लाख लोकांना बसलाय.
पटना : बिहारामध्ये कोसी आणि गंगेला आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 90 जणांचा बळी गेला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात आलेल्या महाभयंकर पुराचा फटका जवळपास 50 लाख लोकांना बसलाय.
सध्या दोन्ही राज्यात मिळून एनडीआरएफच्या 56 तुकड्या मदत कार्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. एकट्या बिहारमध्ये 26 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. यंदा पुराच्या विळख्यात बिहारमधले सात तर उत्तर प्रदेशातल्या सहा जिल्हे आहेत.