नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळलीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात पर्यटनासाठी आलेल्या परदेशी महिला पर्यटकांनी गावाच्या ठिकाणी लहान स्कर्ट घालू नये असा गजब सल्ला केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी दिलाय. तसेच रात्रीच्या वेळेत एकट्याने न फिरण्याचा सल्ला देखील त्यांनी दिलाय. 


याबद्दल काय करा आणि काय करू नका यासंदर्भातल्या सुचना विदेशी पर्यटकांना विमानतळावरच दिल्या जातील. भारतीय संस्कृती हि विदेशी संस्कृतीपेक्षा वेगळी असल्याने असा सल्ला दिल्याचं त्यांनी सांगितलं.