विदेशी फेसबूक फ्रेंडला भारतात बोलावून केला...
दिल्लीमध्ये एका विदेशी महिलेने तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. उज्बेकिस्तानमध्ये राहणाऱ्या या तरुणीने आरोप केला आहे की, फेसबूकवर माझ्यासोबत मैत्री केली आणि मला भारतात बोलावलं. त्यानंतर मला देहविक्रीच्या धंद्यात ढकललं.
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एका विदेशी महिलेने तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. उज्बेकिस्तानमध्ये राहणाऱ्या या तरुणीने आरोप केला आहे की, फेसबूकवर माझ्यासोबत मैत्री केली आणि मला भारतात बोलावलं. त्यानंतर मला देहविक्रीच्या धंद्यात ढकललं.
विदेशी तरुणीने वसंतकूज पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या तरुणीचा मेडिकल टेस्ट केला आहे आणि आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही