नवी दिल्ली : चाणक्यपुरी भागात केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांनी चार मुलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर स्मृती ईराणी यांच्या गाडीचा पाठलाग करण्याचा आरोप आहे. चारही आरोपी दिल्ली यूनिवर्सिटीचे विद्यार्थी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी संध्याकाळी जवळपास ५ वाजण्याच्या सुमारास केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी एअरपोर्टहून त्यांच्या निवासस्थानी निघाल्या होत्या. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की, एक कार त्यांचा पाठलाग करत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांच्या हे लक्षात येताच त्यांनी नंतर त्या मुलांच्या गाडीचा पाठलाग करणं सुरु केलं.


त्या मुलांना पकडल्यानंतर स्मृती ईराणी यांनी १०० नंबरवर कॉल केला आणि पोलिसांना बोलावून घेतलं. त्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी चारही मुलांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. 


मागच्या २ वर्षापूर्वी स्मृती ईराणी यांनी ३ एप्रिल, २०१५ ला गोवा येथे फॅब इंडियाच्या शोरूममध्ये एक गुप्त कॅमेरा पकडला होता. त्यानंतर तक्रार नोंदवली आणि ४ लोकांना पोलिसांनी या प्रकरणात अटक केली होती.