नवी दिल्ली : मध्यप्रदेशच्या रिवा जिल्ह्यात पिकनिकला गेलेले चार तरुण धबधब्यात वाहून गेल्याची घठना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्वी रिवा धबधब्याजवळ ही घटना घडलीय. पिकनिकसाठी हे चार तरुण इथं आल्याचं सांगण्यात येतंय. वाहत्या पाण्याच्या मधोमध हे तरुण पोहचले होते. 


जेव्हा ते पाण्यात शिरले तेव्हा पाण्याचा जोर कमी होता. परंतु, अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि चारही जण नदीच्या मधोमध फसले. 


यावेळी पाण्याच्या प्रवाहाजवळ अनेक लोक उभे होते. परंतु, पाण्याचा प्रवाह जोरात सुरू झाल्याने कुणीही पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला नाही. 


पाण्यात अडकलेल्या चारही तरुणांनी काही वेळ पाण्यात उभं राहण्याचा आणि स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाण्याच्या प्रवाहाला आलेल्या तेजीत त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला... आणि ते वाहत्या पाण्यात ओढले गेले... 


पावसाळ्यात अनेक जण या धबधब्याजवळ भिजण्यासाठी येतात. डोंगरांमधून या धबधब्यात पाणी येतं. परंतु, पाऊस जोरात असल्यानं अचानक पाण्याची पातळी वाढली आणि ही घटना घडली. 


मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनीदेखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलंय.