नवी दिल्ली : आजपासून पेट्रोल पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल भरताना डिजीटल पेमेंट करणा-या ग्राहकांना 0.75 म्हणजेच पाऊण टक्का सूट मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल पंपावर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तसेच मोबाईल वॉलेटचा वापर केल्यास ग्राहकांना ही सवलत मिळणार आहे. यात ग्राहकांना मिळणा-या सवलतीचे पैसे पुढील तीन दिवसांत त्यांच्या खात्यात जमा होतील. 


नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारनं कॅशलेस व्यवहारावर भर दिलाय. याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. 


पेट्रोलपंपांवरील कॅशलेस व्यवहार वाढवण्यासाठी ही सवलत देण्यात आलीये. या निर्णयामुळे मुंबईत पेट्रोलवर प्रतिलिटरमागे 54 पैसे तर डिझेलवर प्रतिलिटरमागे 45 पैशांची सूट मिळणार आहे.