पेट्रोल पंपावरील मोठा भ्रष्टाचार उघड, लोकांना लाखोंचा चुना
पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये STF ने हे प्रकरण समोर आणलं आहे. STF ची टीमने लखनऊमध्ये गुरुवारी रात्री ७ पेट्रोल पंपांवर छापे मारले. यामध्ये उघड झालं की, पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांना चुना लावत होते.
लखनऊ : पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये STF ने हे प्रकरण समोर आणलं आहे. STF ची टीमने लखनऊमध्ये गुरुवारी रात्री ७ पेट्रोल पंपांवर छापे मारले. यामध्ये उघड झालं की, पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांना चुना लावत होते.
ग्राहकांनी एक लीटर पेट्रोलची किंमत मोजून 940 ते 950 एमएल पेट्रोलच मिळत होतं. म्हणजे लीटरमागे 50 ते 60 एमएल पेट्रोलची चोरी होत होती. रोज 40 ते 50 हजार रुपये यातून हे कमवत होते म्हणजेच महिण्याला 12 ते 15 लाख रुपये लोकांना फसवून हे कमवत होते.