सिंगापूर : अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड कुमार पिल्लई ज्याच्या अटकेसाठी मुंबई पोलीस गेली अनेक वर्ष प्रयत्नात आहेत त्याला सिंगापूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. त्याच्यावर खून आणि लूटमारीचे अनेक गंभीर आरोप आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंडियन एक्सप्रेस' वृत्तपत्राच्या बातमीनुसार कुमार पिल्लई याला इंटरपोलने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीस अंतर्गत अटक करण्यात आली आहे.


दरम्यान मुंबई पोलीस पकडलेली ही व्यक्ती कुमार पिल्लईच आहे का याची खात्री करत आहेत. त्याची ओळख पटल्यावर लगेचच त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले जाणार आहेत.  कुमार पिल्लई सिंगापूरमध्ये खोट्या ओळखीने राहात होता. त्याला तेथील पोलिसांनी विमानतळावर अटक केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


मुंबईत विक्रोळी भागात पिल्लई याचा दबदबा होता. बांधकाम व्यवसायात त्याने आपले साम्राज्य वसवले होते. दहशतवादी संघटना एलटीटीई याच्याशी त्याचे जवळचे संबंध होते, असेही म्हटले जाते.


आजपर्यंत तो युनायटेड किंग्डम, तामिळनाडू, श्रीलंका आणि सिंगापूर अशा तामिळ लोकांची दाट लोकवस्ती असणाऱ्या भागांमध्ये फिरत होता.