नवी दिल्ली :  गॅस सिलिंडर अनुदानाचा लाभ घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी. तुम्ही अजुनही आधार कार्ड नंबर गॅस वितरक यांच्याकडे दिला नसेल तर तुम्हाला मोठे नुकसान सोसावे लागेल. १ डिसेंबरनंतर आधार कार्ड विना गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. ती बंद होईल.


जर तुम्हाला गॅसची सबसिडी पाहिजे असेल तर आधार नंबर देणे जरुरीचे आहे. तुम्ही गॅस सिलिंडरचा वापर करत असाल तो तुम्हाला आधार कार्डनंबर देणे बंधनकारक आहे. नाहीतर तुम्ही कायमचे सबसिडीला मुकणार आहात. गॅस वितरकांकडे आधार कार्ड नंबर देण्याचे केंद्र सरकारने कळविले. मात्र, अद्याप त्याकडे लक्ष दिलेले नाही. नोटबंदीनंतर सरकार आता गॅस सिलिंडर अनुदानावर नजर ठेवणार आहे. त्यासाठी नियम कडक करणार आहे.