हैदराबाद महापालिका निवडणूक : टीआरएसचा ऐतिहासिक विजय
हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज दुपारी ३.३० मिनिटांनी सुरू झाली. यात तेलंगणा राष्ट्र समिती आघाडी घेतली असून काँग्रेस आणि टीडीपीने मोठा पराभवाला सामोरे जावे लागत आहे. ओवैसी यांच्या एमआयएमने गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी जागांवर आघाडी घेतली आहे.
हैदराबाद : हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज दुपारी ३.३० मिनिटांनी सुरू झाली. यात तेलंगणा राष्ट्र समितीने १०२ जागांवर विजय मिळविला आहे घेतली असून काँग्रेस आणि टीडीपीने मोठा पराभवाला सामोरे जावे लागत आहे. ओवैसी यांच्या एमआयएमने गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी जागांवर आघाडी घेतली आहे.
आज सकाळ ८ वाजता मतमोजणी होणार होती. पण ती ३ वाजेपर्यंत पुढे ढकलली. एकूण 74,23,980 मतांपैकी 33,60,543 मतदारांनी मतदान केले. यात सलमान खानच्या मतदान ओळखपत्राचा विषय या निवडणुकीत गाजला होता.
गेल्या वर्षी निवडणुकीत नसलेल्या टीआरएसने १०२ जागांवर विजय मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
पक्ष |
आघाडी |
२००९ |
२०१६ विजयी |
टीआरएस |
० |
० |
१०२ |
टीडीपी |
३ |
४५ |
१ |
भाजप |
० |
५ |
३ |
एमआयएम |
४ |
४५ |
३५ |
काँग्रेस |
० |
५२ |
२ |
इतर |
० |
५ |
० |