केरळ : वेगवेगळ्या जातीधर्मात लग्नाच्या विविध चाली रिती असतात. मुस्लीम धर्मामध्ये देखील मेहर अशी एक रिती आहे ज्यामध्ये मुलगी तिच्या होणाऱ्या पतीकडे काहीतरी मागते. अनेक मुली दागिने, पैसे किंवा महागड्या वस्तू मागतात पण एका तरुणीने नवीन आदर्श घालून दिला आहे. तिने तिच्या होणाऱ्या पतीकडे असं काही मागितलं की सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमधील मलप्पुरम येथे राहणारी शहला नेचियीलने मेहरच्या रुपात ५० पुस्तकं मागितली. शहलाने हैदराबाद यूनिवर्सिटीमधून पॉलिटिकल साईन्समध्ये एमए केलं आहे. एवढंच नाही तर शहलाने तिच्या होणारऱ्या पतीकडे त्या ५० पुस्तकांची लिस्ट देखील दिली आहे. शहलाच्या पतीने आनंदाने त्याचा स्विकार केला आणि सगळी पुस्तकं तिला शोधून आणून देणार आहे. ११ ऑगस्टला यांचं लग्न झालं.


शहला म्हणते की, 'तिने अनीसला जी यादी दिली होती ती पुस्तकं शोधणं थोडं कठीण आहे. माझासाठी हेच मेहर आहे. कुटुंबातील लोकं देखील माझावर खूश आहेत आणि मी धर्माचं पालन करुन ही गोष्ट केली आहे.'