१३ वर्षांची आई बनलेल्या मुलीचे दुःख, `अम्मी! मेरे पेट में कीड़े रेंग रहे हैं`
तेरा वर्षाच्या कच्चा वयात आई बनलेल्या छोट्याशा मुलीला गल्लीतील छोट्या मुलांसोबत गोट्या खेळणे आणि पतंग उडविणे आवडते. तिला हे माहिती नाही की आठ दिवसापूर्वी तिनेच एका बाळाला जन्माला दिला आहे.
मेरठ : तेरा वर्षाच्या कच्चा वयात आई बनलेल्या छोट्याशा मुलीला गल्लीतील छोट्या मुलांसोबत गोट्या खेळणे आणि पतंग उडविणे आवडते. तिला हे माहिती नाही की आठ दिवसापूर्वी तिनेच एका बाळाला जन्माला दिला आहे.
आपल्यासोबत झालेल्या दुष्कर्माबद्दल ती म्हणते की मी त्यांना बडे अब्बू म्हणायची.
शाळेत माझे मन लागत नव्हते म्हणून अम्मीने मला शिफा शिकण्यासाठी त्यांच्याकडे पाठविले. एक दिवशी बडे अब्बूने माझ्यासोबत वाईट काम केले. त्या दिवसानंतर माझ्या पोटात किडे चालू लागले. मी अम्मीला म्हटली की माझ्या पोटात कीडे झाले आहे. त्यांना काढा, पण अम्मी आणि अब्बू रडू लागायचे.
दुष्कर्म झालेल्या पीडित किशोरीने २० जुलैला एका मुलाला जन्म दिला. तिने आरोपीबद्दल सांगितले की ते माझ्या अब्बूचे मोठे भाऊ आहेत. आम्ही त्यांच्या घरी खूप खेळत होतो. त्यांचेही आमच्या घऱी रोज येणे जाणे होते.
५५ वर्षांच्या नराधमाने केला बलात्कार, १३ वर्षांची मुलगी झाली आई
एक दिवशी शिफा शिकण्यासाठी त्यांच्या घरी गेली तर बडे अब्बूने दरवाजा बंद करून माझ्यासोबत चुकीचे काम केले. मी ओरडली तर मला मारले. मी म्हटले की अम्मी आणि बडी अम्मीला सांगणार तेव्हा त्यांनी धमकी दिली की तुझ्या अब्बू आणि अम्मीला ठार मारेल. मग भीतीमुळे मी काहीच बोलली नाही.