नवी दिल्ली :  पंजाबच्या गोरक्षा दलाचा प्रमुख सतिश कुमारला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सतिश कुमारवर गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, या प्रकरणी तो फरार होता, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतिश कुमार याच्यासह गोरक्षा दलाचे अन्य काही सदस्य गोरक्षणाच्या नावाखाली काही लोकांना जबरदस्त मारहाण करत आहे, असं एका व्हिडिओतून समोर आले होते. 


मारहाणीच्या व्हिडिओ पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात बोलताना बनावट गोरक्षकांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ८ ऑगस्ट रोजी सतिश कुमारवर पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सतिश कुमारवर पटियाला पोलिसांनी अपहरण आणि भारतीय दंड संहितेतील अन्य काही कलमांखाली अटक केली आहे. 


'जर गोरक्षण करत असल्याने मला कोणी गुंड म्हणत असेल तर मला काहीही फरक पडत नाही. गुंडाच्या नावाखाली जर मी गोरक्षण करत असेल तर देशातील सर्वात मोठा गुंड असल्याचा मला अभिमान आहे', असं एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सतिश कुमारने म्हटलं आहे.