नवी दिल्ली : दिल्लीच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळतेय. सोन्या-चांदीच्या खरेदीत घसरण झाल्याने त्याचा परिणाम यांच्या किंमतीवर पाहायला मिळतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळेच गेल्या आठवड्यात सोन्याचा दर प्रतितोळा २९०५० रुपयांवर येऊन पोहोचला. तर दुसरीकडे चांदीचे दरही घसरले. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर आठवड्याभरात १,२०४.५० डॉलर प्रति औंसवर येऊन पोहोचले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर अनुक्रमे २८.८५० आणि २८,७०० रुपयांवर बंद झाले.
चांदीच्या दरातही या आठवड्यात मोठी घट झाली. चांदीचे दर ४०,९८०वर बंद झाले.