नवी दिल्ली  : गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा सोन्याचे भाव कोसळलेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पैशांची सोन्याच्या स्वरुपात गुंतवणूक करत असाल तर सावधान... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी सोन्याची किंमत १०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचलीय. यासोबतच सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम २९,३५० रुपयांवर पोहचलीय. 


दुसरीकडे चांदीच्या किंमती मात्र उसळल्यात. तब्बल ७०० रुपयांची उसळी घेऊन चांदी प्रती किलो ४१,४३५ रुपयांवर येऊन पोहचलीय. 


नोटाबंदीच्या निर्णयानंतर राष्ट्रीय राजधानीच्या क्षेत्रात सर्राफा बाजारात सोन्याची किंमत कोसळली. १६ दिवसांनंतर बाजार उघडल्यानंतर सोमवारी सोन्याच्या किंमती १७५० रुपयांनी कोसळल्या.