नवी दिल्ली :  सोन्यात मंगळवारी जबरदस्त घट दिसून आली. सोने २५० रुपयांनी घसरून सहा महिन्याच्या खालच्या स्तरावर म्हणजे २८,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे. जागतिक स्तरावर सोन्याची मागणी कमी झाल्याने दर खाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोटबंदी नंतर सध्याचे रोखीचे संकट घरगुती बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे सोना आणि किरकोळ विक्रेत्यांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या भावावर परिणाम झाला आहे. 


पण दुसरीकडे औद्योगिक आणि शिक्के बनिवणाऱ्यांची मागणी घटल्याने चांदी १०० रुपयांनी कमी होऊन प्रति किलो ४१,१०० पर्यंत खाली गेली आहे. सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर लगाम लावण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदीनंतर रोख रक्कम कमी झाील आहे. त्यामुळे सोने खरेदी कमी झाली आहे.