वायदे बाजारही पडला... सोनं आणखी स्वस्त होणार!
वैश्विक पातळीवर सोन्याच्या किंमतीत आलेल्या मंदीमुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा घसरताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : वैश्विक पातळीवर सोन्याच्या किंमतीत आलेल्या मंदीमुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा घसरताना दिसत आहेत.
परदेशी बाजारात घसरत चाललेल्या किंमतींमुळे भारतातील सराफा व्यापाऱ्यांनी आपल्या जमा व्यवहारातील अनेक व्यवहार रद्द केल्यानं वायदे बाजारात आज सोन्याच्या किंमती 46 रुपयांनी घसरताना दिसल्या. त्यामुळे सोन्याची किंमत 28,697 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचल्या.
याचप्रमाणे सोन्याची जून महिन्यात होणाऱ्या डिलीव्हरीच्या व्यवहारांमध्येही सोन्याच्या किंमतीदेखील 41 रुपयांनी घसरल्या. त्यामुळे ही किंमत 28,938 रुपये प्रति 10 ग्रॅमवर येऊन ठेपली.
वैश्विक स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याची किंमत 0.4 टक्के घसरणीसहीत 1,236.85 डॉलर प्रति औंसवर येऊन पोहचली.