नवी दिल्ली : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळतेय. सोन्याच्या दरात १५० रुपयांची वाढ झालीये. सोन्याचे दर प्रतितोळा २९ हजार २५० रुपयांवर पोहोचलेत. महिन्याभरातील सोन्याचा हा उच्चांक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सराफा बाजारात सोन्याची खरेदी पुन्हा वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळतेय. सोन्याचे दर वाढले असले तरी चांदीच्या दरात मात्र घसरण झालीये. चांदीचे दर ५० रुपयांनी स्वस्त होत प्रतिकिलो ४१ हजार २५० रुपयांवर पोहोचलेत. 


गुरुवारी राजधानीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचे दर अनुक्रमे २९,२५० आणि २९,१०० रुपयांवर बंद झाले. याआधी ३ डिसेंबरला सोन्याचे दर २९,२५०वर पोहोचले होते. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झालीये. 


दिल्लीच्या सराफा बाजारात चांदी मात्र घसरलीये. चांदीचा दर ५० रुपयांनी कमी होत प्रतिकिलो ४१,२५०वर बंद झाला.