मुंबई : तुम्ही कधी विचार केला आहे का की गायच्या गोमुत्रामधून देखील सोनं मिळू शकतं. पण जुनागडच्या अॅग्रिकल्चर यूनिवर्सिटीने केलेल्या संशोधनात त्यांना गायच्या गोमुत्रामध्ये सोन्याचे काही कण मिळाले आहेत. यूनिवर्सिटीमध्ये मागील 4 वर्षांपासून यार रिसर्च सुरु होतं. या रिसर्चमध्ये 400 गायींच्या युरिन सॅम्पलवर संशोधन करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युनिवर्सिटीने केलेल्या या संशोधनात हे समोर आलं की, प्रती लीटर यूरिनमध्ये 3 ते 10 मिली ग्रॅम सोन्याचे कण असतात. यूरिनमध्ये सोन्याच्या धातूचे आयन म्हणजेच गोल्ड सॉल्टच्या रूपात सापडतात. गीर जातीच्या 400 गायींच्या गोमुत्र सॅम्पलवर केलेल्या संशोधनात सोन्याचे काही अंश मिळाल्याचं प्रोफेसर गोलकिया यांनी दिले आहेत. केमिकल प्रोसेसद्वारे याला सोन्याचं ठोस रुप दिलं जावू शकतं.


रिसर्चमध्ये उंट, म्हैस, बकरी यांच्या युरिन सॅम्पलवर देखील संशोधन करण्यात आलं पण यामध्ये सोन्याचे कोणतेही कण मिळालेले नाही. गीर जातीच्या गायीच्या यूरिनमध्ये 5,100 कंपाउंड मिळाले. ज्यामध्ये 388 गुण असे होते जे अनेक आजारांना दूर करु शकतात. यानंतर इतर जातीच्या गायींच्या युरिनवर रिसर्च करण्यात येणार आहे.