नवी दिल्ली : सोन्याच्या दरात शनिवारीही घसरण सुरु होती. सोन्याच्या विक्रीत आलेली घट यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात शनिवारी सोन्याच्या किंमतीत ५० रुपयांची घट झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सोन्याचे दर प्रतितोळा २७,८०० रुपये होते. मात्र दुसरीकडे चांदीच्या दरात किरकोळ वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या दरात १० रुपयांची घट होत ते प्रतिकिलो ३८,८१० रुपयांवर पोहोचली.


केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय. नोटांचा तुटवडा असल्याने सोने खरेदीही मंदावलीये. यामुळही सोन्याच्या दरात घट होतेय.