मुंबई : जर तुम्ही आता सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. या वर्षी देखील सोनं मागील वर्षाच्या तुलनेत २ टक्क्यांनी घसरुन २८,६०० रुपयांवर आलं आहे. या वर्षी देखील सोन्यावर मोठ्या रिटर्नची अपेक्षा नाही आहे. कारण अमेरिकेच्या सेंट्रल बँकेकडून जूनमध्ये व्याजदर वाढवण्याची शंका आहे. तर १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होणार आहे. तज्ज्ञांच्या मते जुलैपर्यंत सोन्याचे भाव आणखी कमी होऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलैमध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर जगात सोनं खरेदीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश असणाऱ्या भारतात सोन्याच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो. अमेरिकेच्या सेंट्रल बँक फेडरल रिजर्व्ह बँकेने पुढच्या 13-14 जूनच्या बैठकीत व्याजदरे वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचा भाव ११०० रुपयांनी कमी होऊ शकतो.


जीएसटीमुळे छोट्या ज्वेलर्सच्या अडचणी वाढणार आहेत. यामुळे व्यापार करतांनाही अडचणी येणार आहेत. सोन्याच्या मागणी २०२० पर्यंत ९५० टन होण्याची शक्यता आहे. यावर्षी ७५० टन सोनं विकलं गेल्याची माहिती आहे.