नवी दिल्ली : सोन्याच्या भावानं दहा महिन्यांचा नीच्चांक गाठला आहे. शुक्रवारी सोन्याचे दर 130 रुपयांनी घसरला आहे. सध्या सोन्याचा दर 28,580 रुपये प्रति तोळा आहे. जागतिक बाजारपेठ आणि नोटबंदीमुळे सोन्याची मागणी घटली आहे. याचाच परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे.


सोन्याच्या दरांमध्ये एवढी मोठी घट झाली असली तरी चांदीच्या दरावर मात्र याचा कोणाताही परिणाम झालेला नाही. चांदीचे दर 250 रुपयांनी वाढून 41,850 रुपये प्रति किलो एवढे झाले आहेत. दिल्लीच्या बाजारपेठेमध्ये 99.9 टक्के सोन्याचा दर 28,580 रुपये तर 99.5 टक्के सोन्याचा दर 28,430 रुपये एवढा आहे.