दिल्ली एअरपोर्टवर सॅन्डेलमध्ये लपवलेलं सोनं केलं जप्त
दिल्लीच्या इंदिरा गांधी एयरपोर्टवर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोनं जप्त केलं आहे. एका महिलेकडून कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं आहे.
नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी एयरपोर्टवर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोनं जप्त केलं आहे. एका महिलेकडून कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं आहे.
महिला बँकॉक वरुन दिल्लीला आली होती. महत्त्वाचं म्हणजे तिच्या सॅन्डेलमध्ये हे सोनं लपवण्यात आलं होतं. सँडलच्या खाली सोन्याचे लहान तुकडे लपवण्यात आलं होतं. कस्टम विभागाच्या कर्मचाऱ्यांना तिच्यावर संशय आला आणि चौकशीमध्ये हे सोनं पकडलं गेलं. सोन्याची किंमत 7 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.
कस्टम विभागाने सोनं जप्त केलं असून महिलेची चौकशी होत आहे. हे सोनं कोणाला देण्यासाठी आणलं होतं की स्वत:साठी याबाबतही चौकशी सुरु आहे.