खुशखबर, सोने झाले स्वस्त
वैश्विक स्तरावर झालेल्या घसरणीमुळे शुक्रवारी दिल्लीत सराफा बाजारात सोने लागोपाठ दुसऱ्या सत्रात ५० रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे आता प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ३० हजार ८५० रुपये सोन्याचा दर झाला आहे.
नवी दिल्ली : वैश्विक स्तरावर झालेल्या घसरणीमुळे शुक्रवारी दिल्लीत सराफा बाजारात सोने लागोपाठ दुसऱ्या सत्रात ५० रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे आता प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ३० हजार ८५० रुपये सोन्याचा दर झाला आहे.
तर चांदी ३४० रुपयांच्या घटीसह प्रतिकिलो ४७ हजार ५०० झाली आहे.
लंडनमधून मिळालेल्या माहितीनुसार सोने ४.७० डॉलरने गडबडून १३५६.७० डॉलर प्रति औंस वर खाली आले आहे. ऑगस्टसाठी अमेरिकन सोना वायदा पण तुटून ४.६० डॉलरने खाली जाऊन १३५७.५० डॉलर प्रति औंस बोली लावण्यात आली आहे.