सोने-चांदीच्या किंमती घसरल्या
विदेशातील कमी व्यवसाय आणि सराफांच्या मागणीत घट झाल्यामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याची किंमत २९,६५० रुपये प्रती १० ग्रॅम झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतही १६० रुपयांनी घट झाली आहे. चांदीची किंमत ४१,२०० रुपये प्रती किलो झाली आहे.
मुंबई : विदेशातील कमी व्यवसाय आणि सराफांच्या मागणीत घट झाल्यामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याची किंमत २९,६५० रुपये प्रती १० ग्रॅम झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतही १६० रुपयांनी घट झाली आहे. चांदीची किंमत ४१,२०० रुपये प्रती किलो झाली आहे.
सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव १.४ टक्क्यांनी घसरला आहे. सोन्याचे दर १,२८०.४७ डॉलर प्रती औंस झाले आहे तर चांदीचे भाव ०.८ टक्क्यांनी घसरुन १७.३६ डॉलर प्रति औंस झाला आहे.
राजधानी दिल्लीत ९९.५ टक्के शुद्ध सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या किंमतीतही १६० रुपयांची घसरण झाली आहे.