मुंबई : सोन्याची खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबरच आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या भाव घसरताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत 400 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झालेली पाहायला मिळाली. जागतिक पातळीवर आणि घरगुती बाजारात घटत जाणारी सोन्याची मागणी सोन्याच्या किंमतीवर परिणामकारक ठरलीय. 


घसरणीनंतर 99.0 आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याच्या किंमती क्रमश: 29,150 आणि 29,000 रुपये प्रती 10 ग्रॅमवर येऊन स्थिरावलीय. 


तर इंडस्ट्रियल आणि सोन्याचे नाणे बनवणाऱ्यांकडूनही मागणी घटल्यानं दिल्लीच्या सराफा बाजारात चांदी 41,000 रुपयांमध्ये 500 रुपयांनी घसरत 40,950 रुपये प्रति किलोवर येऊन पोहचलीय.