सोन्या-चांदीचे दर वाढले
सोन्याच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ पाहायला मिळायली.
नवी दिल्ली : सोन्याच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ पाहायला मिळायली.
गुरुवारी सोन्याचे दर ५० रुपयांनी वाढून ते प्रति ग्रॅम २९,१५० रुपयांवर बंद झाले. तर चांदीच्या दरातही वाढ झाली. चांदीच्या दरात ३५० रुपयांची वाढ होत ते प्रति किलो ३९,९५० रुपयांवर बंद झाले.
दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर अनुक्रमे २९,१५० आणि २९,००० रुपयांवर बंद झाले. याआधी बुधवारी सोन्याच्या दरात १८५ रुपयांची वाढ झाली होती.