नवी दिल्ली :  रेल्वे प्रवास आणखी सुविधाजनक आणि खिशाला परवडणारा बनविण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला असून आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तिकीट बूक केल्यास ३० रुपये सर्व्हिस चार्ज आता द्यावा लागणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही सुविधा १ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. सध्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डाने तिकीटाचे पैसे भरल्यास ३० रुपयांपर्यंत सर्व्हिस चार्ज द्यावा लागतो. पण आता ऑनलाइन तिकीट खरेदी केल्यास ३० रुपयांचा फायदा होणार आहे. यापूर्वी हे ३० रुपय वाचविण्यासाठी थेट काउंटरवरून तिकीट बुकिंग करायचे. 


तसेच भारतीय रेल्वेने १ जुलैपासून आपल्या नियमात बदल करून आणखी प्रवाशांचा फायदा होणार आहे.