नवी दिल्ली : तुमच्याकडे जनधन खाते असेल तर तुम्हला विमाचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकार ३ वर्षे २ लाखांचा विमा हप्ता भरणार आहे. तसा विचार सुरु आहे. याबाबत सामान्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात २७ कोटी जनधन बँक खातेदार आहेत. गरीब वर्गाची सामाजिक सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी जनधन खातेधारकांना पुढल्या ३ वर्षांपर्यंत २ लाखांचा विमा विनामूल्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर याच अर्थसंकल्पात ही घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली करण्याची शक्यता आहे.


२७ कोटी जनधन खात्यांपैकी १६ कोटी खाती आधार कार्डाशी संलग्न आहेत. नव्या विमा योजनेनुसार अपघात आणि जीवन अशा दोन्ही प्रकारच्या विम्याचा लाभ मिळणार आहे. या योजनेत विमाधारकाच्या ३ वर्षांच्या विमा प्रीमियमची पूर्ण रक्कम सरकार भरणार आहे.