नवी दिल्ली : महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांना मोफत हेल्थ चेकअप, कॅशलेस मेडिकल सर्व्हिस आणि टॅक्समध्ये सवलत देण्याची योजना सरकार आणणार आहे. या योजने अंतर्गत महिलांना टॅक्समधील सवलतीसह मोफत हेल्थ चेकअप करुन दिलं जाणार आहे. 


परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची एक टीम या सर्व योजनांवर काम करत असल्याची माहिती मिळतेय. लवकरच या योजनेची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.