सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? या प्रश्नावर भाजपमध्ये सुरू असलेला खल अखेर संपुष्टात आलाय.
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? या प्रश्नावर भाजपमध्ये सुरू असलेला खल अखेर संपुष्टात आलाय.
लखनऊमध्ये या प्रश्नावर उत्तर सापडलंय. योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील, यावर जवळपास एकमत झालंय.
एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा 'वादग्रस्त' ठरलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. भाजप आमदार बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदार संघातून सलग सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्रीपदी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. उद्या त्यांचा शपथविधी पार पडेल.