नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर बॅंक खात्यांच्या मर्यादीत  रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा केलेल्यांवर आयकर विभागाकडून ६० टक्के टॅक्स लावला जाण्याचा अंदाज आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, गुरूवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबीनेट बैठकीत  बॅंक खात्यांच्या मर्यादीत रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा करणाऱ्यासाठी एक वेगळी जमा योजना आणण्यात येईल किंवा बॉन्ड आणण्यात येईल. ज्यामध्ये जुन्या नोटा जमा करता येणार आहेत अशी चर्चा झाल्याचे अंदाज आहेत.  

सरकारच्या नोटबंदीनंतर जनधन खात्यांवर सध्या जमा झालेल्या २१ हजार कोटी रूपयांचा घटनांमुळे १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान बॅंक खात्यांमध्ये जमा केलेल्या बेहिशेबी रकमेवर टॅक्स लावण्याच्या विचारात आहे. तसेच आयकर विभागाचे खास करून जनधन खात्यांवर करडी नजर असणार आहे.

सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर काळापैसा जमावणाऱ्यामध्ये मोठे  भीतीचे वातावरण आहे. आयकर विभागाकडून पहिलाच सांगण्यात आले होते की, नोटाबंदीनंतर बॅंक खात्यांमध्ये २.५ लाखपेक्षा जास्त रक्कम जमा  झाल्यास टॅक्सबरोबरच २०० टक्के दंडाला सामोरे जावे लागणार आहे.

काळापैसा जमवणाऱ्या बहुतेकांनी ५०० आणि १००० च्या नोटा जाळून टाकल्या अथवा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, सरकारची अशी इच्छा आहे की ,लोकांनी त्या नोटा न जाळता बॅंकेत जमा कराव्या.