लखनऊ : देशात डॉक्टरांची कमतरता दिसून येत आहे. अनेक रग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून आता सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्यात आलेय. तशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी डॉक्टरांची निवृत्तीचे वय सध्या ६० ते ६२ आहे. केंद्रातील एनडीए सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उत्तर प्रदेशात सहारनपूर येथे आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी सरकारच्या दोन वर्षांच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. त्यावेळी ही घोषणा केली.


देशात डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली जाईल. जर मेडिकल महाविद्यालयांची संख्या वाढविली असती तर डॉक्टरांची कमतरता भासली नसती. परंतु गरीब कुटुंबीयांना उपचार मिळाले पाहिजेत यासाठी देशातील सर्व सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ करण्यात येईल, असे मोदी म्हणालेत.