नवी दिल्ली : केंद्र सरकार सध्या एका प्रस्तावावर विचार करतंय जो कर्मचाऱ्यांच्या मूळवेतनाशी संबंधित आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला तर कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन हे २४ हजार रुपये होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद यांनी भारतीय मजदूर संघ, कर्मचारी आणि प्रतिनिधींशी बोलतांना याबाबतची माहिती दिली आहे. ७ व्या वेतन आयोगात सरकारने कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्ता २३.५५ टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सैनिकांसाठी देखील वन रँक वन पेंशन योजना लागू करण्याचा प्रस्ताव यामध्ये मांडला आहे. 


केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटलींना सोपवण्यात आलेल्या एका प्रस्तावात कमचाऱ्यांचं मूळवेतनमध्ये 16%, भत्त्यामध्ये 63% तर पेंशनमध्ये 24% वाढ करण्याची शिफारस केली आहे. तसेच दरवर्षी 3 टक्क्यांनी देखील पगार वाढीचा प्रस्ताव करण्यात आला आहे.