नवी दिल्ली :  ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर आता केंद्र सरकार आणखी एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सरकार आयकर (इन्कम टॅक्स ) रद्द करण्यासाठी योजना आखत असल्याची जोरदार चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्कम टॅक्स संपविण्याचा सल्ला 'अर्थक्रांती' या संस्थेचा आहे. मोदी सरकारने मोठ्या नोटा बंद  करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो त्यांचाच सल्ला असल्याचे सांगितले जात आहे.


इन्कम टॅक्स पू्र्णपणे रद्द करण्याचा प्रस्ताव वेळोवेळी समोर येत आहे. मात्र, अजुनही त्याबाबत गंभीरतेने घेतलेले नाही. मात्र, नोटबंदी सारख्या मोठ्या निर्णयानंतर आता इन्कम टॅक्स रद्द करण्याची चर्चा लोक करत आहेत. तसेच इन्कम टॅक्स  रद्द करण्याचे बोलत आहेत. कारण पंतप्रधान मोदी यांना नोटबंदीचा प्रस्तावाचा सल्ला देणारी 'अर्थक्रांती'ही याचे समर्थन करीत आहे.


'अर्थक्रांती'चे प्रमुख अनिल बोकीळ यांनी पंतप्रधान मोदी यांना जे सल्ले दिले होते, त्यामध्ये इन्कम टॅक्स रद्द करण्याचा मुद्दा पहिल्या क्रमांकावर होता. त्यामुळे नोटबंदीनंतर आता ते या पहिल्या मुद्द्यावर अधिक भर देण्याची शक्यता आहे.


अनिल बोकीळ यांचे म्हणणे आहे, नोटबंदी झाली. याचे स्वागत आम्ही करतो. मात्र, अर्धे काम बाकी आहे, ते म्हणजे सर्व टॅक्स रद्द करुन बीटीटी सुरु करणाचे. आम्ही आता याच्यावर जोर देणार आहोत. बीटीटी म्हणजे बॅंकिंग ट्रान्सजॅक्शन टॅक्स होय. हा कर बॅंकिंगच्या माध्यमातून देणे-घेण्यातून वसूल केला जाईल.


 'अर्थक्रांती'च्या मते बीटीटीचा दर २ टक्के असू सकतो. बोकील यांचे म्हणणे आहे की, देशात इन्कम टॅक्स नकोच. सर्व डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स रद्द होऊन तेथे बीटीटी लागू केला पाहिजे. हा बीटीटी गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स अर्थात जीएसटीपेक्षा चांगला आणि उत्तम असू शकेल.