एनडीटीव्ही इंडियावरची बंदी स्थगित
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेली एक दिवसाची बंदी स्थगित केली आहे. पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. एनडीटीव्हीचे प्रणव रॉय आणि माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकैय्या नायडू यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेली एक दिवसाची बंदी स्थगित केली आहे. पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. एनडीटीव्हीचे प्रणव रॉय आणि माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकैय्या नायडू यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी एनडीटीव्ही इंडियानं गोपनिय आणि संवेदनशील माहिती लाईव्ह दाखवली, असा ठपका ठेवून माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही इंडिया 9 नोव्हेंबरला बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. एनडीटीव्ही इंडियानं आजच या आदेशाविरोधात सुप्रिम कोर्टामध्ये धाव घेतली होती.