पीएफ रकमेवरील टॅक्स रदद् करण्याचं `खरं कारण`
आणि सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काल अर्थसंकल्प सादर केला, यात त्यांनी पीएफची रक्कम काढताना ६० टक्के रकमेवर कर लावण्याची घोषणा केली.
मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाला सोशल मीडियावर कडाडून विरोध झाला, आणि सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. कारण पीएफची रक्कम ही चाकरमान्यांसाठी तशी जिव्हाळ्याची ठेव असते.
काही नाही तर पगारातून माझा पीएफ शिल्लक पडतोय, आणि पीएफ ही बचतीची विश्वासार्ह बाब समजली जाते.
मात्र आपल्या हक्काच्या रकमेवरच सरकारने डोळा ठेवला आणि पीएफ रक्कम काढताना ६० टक्के रकमेवर कर लावण्याची घोषणा सरकारने बजेटमध्ये केली, असं नोकरदारांना वाटल्याने या निर्णयावर सर्व बाजूंनी टीका होत आहे.
या घोषणेवर लोकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे, ट्वीटरवर हॅशटॅग #RollbackEPF ट्रेंड करतोय.
#RollbackEPF चा वापर आता लोक आपलं पीएफवरील दुखणं शेअर करण्यासाठी वापर करीत आहेत.