देशभरात पगार वेळेवर पोहोचवण्यासाठी जवान उतरले मैदानात
पगार वेळेवर मिळावा म्हणून प्रयत्न
नवी दिल्ली : आज महिन्याचा पहिला दिवस आहे. हा दिवस म्हणजे प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो कारण या दिवशी सगळ्यांना पगार मिळणार असतो. नोटबंदीनंतर देशात पैशाचा तूटवडा निर्माण झाला. नोटबंदीनंतर केंद्र सरकार आणि आरबीआयने या तारखेसाठी खास उपाययोजना केल्या आहेत. कारण कर्मचाऱ्यांना पेंशन आणि त्यांचा पगार वेळेवर मिळावा.
पगार वाटपासाठी बँकांमध्ये अधिक कर्मचारी काम करत आहेत. तर लष्कर आणि हवाईदलाची देखील मदत घेतली जात आहे. नोट छापणाऱ्या कारखान्यांमध्येही दिवस रात्र काम सुरु आहे. देशभरात पैशे पुरवण्याचं काम सुरु आहे.
देवास प्रिंटिंग प्रेसमधून नोट छापल्यानंतर हवाईदलाचं विमान देशभरात ते पोहोचवण्याचं काम करत आहे. २०० सैनिक यासाठी काम करत आहेत. सोमवारपासून जवान यासाठी काम करत आहेत. केंद्र सरकारने पगार हे वेळेवर पोहोचतील असं म्हटलं आहे. सध्या एटीएममधून २५०० रुपये आणि बँकांमधून आठवड्यात २४ हजार रुपये काढता येणार आहेत.