नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळपैशावर प्रहार केला. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर आयकर विभाग आणि सीबीआय मोठ्या प्रमाणात कारवाई करतांना करतांना दिसत आहे. तर काळापैशा लपवण्यासाठी अनेकांनी महागड्या गाड्या खरेदी केल्याचं देखील समोर आलं आहे. यावर सरकारचं लक्ष गेल्यानंतर आता अशा लोकांवर कारवाईची तयारी सरकार करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इनकम टॅक्स विभागाने महाराष्ट्राचे ट्रांसपोर्ट कमिश्नर डॉ. प्रवीण गेडाम यांना इनकम टॅक्स अॅक्ट 1961, सेक्शन 131 नुसार पत्र लिहून याची माहिती मागितली आहे. वर्ष 2014-2015, 2015-2016 आणि 2016-2017 मध्ये किती लोकांनी ५० लाखापेक्षा अधिकच्या गाड्या खरेदी केल्या याची माहिती आरटीओ कार्यालयाकडून मागवली आहे.


महागड्या कार घेणाऱ्या व्यक्तींची माहिती आयकर विभागाने मागितली आहे. जर पैसे संशयितपणे दिले गेले असतील तर त्यांची चौकशी देखील होऊ शकते. ७ दिवसाच्या आत अशा लोकांची माहिती मागवण्यात आली आहे.


एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ८ नोव्हेंबरला नोटबंदीनंतर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबादमध्ये अनेकांनी महागड्या गाड्या खरेदी केल्याचं समोर आलं आहे.