नोटाबंदीनंतर आता येणार प्लास्टिक नोटा!
नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार प्लास्टिकच्या नोटा आणण्याच्या तयारीत आहे. अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी संसदेत याबद्दल माहिती दिली.
मुंबई : नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार प्लास्टिकच्या नोटा आणण्याच्या तयारीत आहे. अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी संसदेत याबद्दल माहिती दिली.
लवकरच प्लास्टिकच्या नोटा छापण्यात येतील. यासाठी कच्चा माल खरेदी केला जाईल. भारतीय रिझर्व्ह बँक गेल्या अनेक काळापासून प्लास्टिक करन्सी लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये सरकारनं संसदेत दिलेल्या माहितीप्रमाणे १० रुपयांच्या एक अरब प्लास्टिक नोटा छापण्यात येणार आहेत. याच्या फिल्ड ट्रायलसाठी पाच शहरांची निवड करण्यात आलीय. यामध्ये कोचीन, मैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.
प्लास्टिकच्या नोटा पेपरच्या नोटांच्या तुलनेत साफ ठेवता येऊ शकतात. त्यांना पॉलीमर नोटही म्हटलं जातं. प्लास्टिकच्या नोटांचं आयुष्य हे पेपरच्या नोटांच्या तुलनेत जास्त असतं.
तसंच प्लास्टिकच्या नोटा या वजनान हलक्या असतात तसंच या नोटा रिसायकल करून छर्रे बनवले जातात. कागदाच्या नोटा मात्र नष्ट करण्यासाठी त्यांना जाळण्यात येतं. प्लास्टिकच्या नोटांची नकल करणं कठिण ठरतं. अशा प्रकारच्या नोटा ऑस्ट्रेलियाशिवाय कॅनडा, फिजी, मॉरिशिअस, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, रोमानिया आणि व्हिएतनाम या देशांमध्ये आढळतात.