नवी दिल्ली : राष्ट्रपतींनी आयकर सुधारणा विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं असून त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या कायद्याअंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राबवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योजनेची उद्यापासून 31 मार्चपर्यंत अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  या योजनेअंतर्गत काळा पैसा स्वत:हून जाहीर केल्यास 50 टक्के कर भवाला लागणार आहे.  मात्र त्यानंतर काळा पैसा पकडला गेल्यास रकमेच्या 85 टक्के दंड आकारण्यात येणार आहे.


विशेष म्हणजे या योजने अंतर्गत रक्कम जाहीर करणा-यांची नावं गुप्त ठेवण्यात येणार असल्य़ाची माहिती केंद्रीय महसूल सचिव हसमुख अ़डिया यांनी दिली आहे.